बापट गुरुजी यांचे निधन

बदलापूर,दि.१८(वार्ताहर)-बदलापूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून यज्ञ साधना करणारे अध्यात्मिक गुरुम्हणून परिचित असणारे वासुदेव वामन बापट उर्फ बापट गुरुजी (६४)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस दर्शना दामले, माजी उपनगराध्यक्ष आशिष दामले यांचे सह असंख्य अनुयायांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. बापट गुरुजी यांनी १५ वर्षांपूर्वी बदलापुरात यज्ञ पर्व सुरु केले होते.खोपोली परिसरातही परमहंस परिप्राज्काचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे ) स्वामी महाराजांच्या कार्याचे आणि त्यांच्या साहित्य प्रचाराचे कार्य बापट गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सुरु होते. बापट गुरुजींच्या निधनाबद्दल त्यांच्या अनुयायांनी आमचा मार्गदर्शक, आधारस्तंभ हरपला अशा शब्दात शोक व्यक्त केला. त्यांनी अघोरकष्टोधरण स्तोत्र, यज्ञरहस्य, गुरुस्तुती, मंत्रात्मक श्लोक, नर्मदा परीक्रमा: एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा, चित्तसदबोध नक्षत्रमाला, करुणात्रिपदी अशा वेगवेगळ्या विषयांवरील २७ पुस्तकांचे लिखाण केले.