शिरवली पं.स.गणातून कृष्णा दवणे निवडणुकीच्या रिंगणात

मुरबाड,दि.६(वार्ताहर)-ठाणे जि.प.व मुरबाड पं.स.च्या निवडणुका जाहिर झाल्या अन् सर्वच राजकिय पक्ष खडबडून जागे झाले, त्याबरोबरच कधी नव्हे तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष ही कामाला लागला. मुरबाड तालुक्यातील पहिला प्रयोग म्हणून पक्षाने शिरवली गणातुन कॉ. कृष्णा दामोदर दवणे यांना उमेदवारी देवून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. खरंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा गोरगरीबांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारा पक्ष, मात्र मुरबाड तालुक्यातुन कालबाह्य ठरलेला, मात्र जि.प. अन् पं.स.च्या निवडणुकीसाठी आहेत, नाहीत असे कार्यकर्ते अंग झटकून एकत्र येवून कामाला लागले आणि आपला हक्काचा उमदे वार म्हणनू त्यांनी कृष्णा दवणे यांना शिरवली पंचायत समितीत निवडणुकीसाठी प्रवृत्त करून प्रचाराला जोरदारपणे सुरुवातही केली. नुकताच पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉं.रमेश गायकवाड व नारायण पाटोळे यांनी पुढाकार घेऊन दिल्लीसारख्या ठिकाणी अनेक शेतकर्‍यांना स्वखर्चाने नेऊन शेतकर्‍यांना महिना ३००० पेन्शन मिळावी म्हणनू जारे दार आदं ाले न करुन सरकारला तसा निर्णय घेण्यास भाग पाडल.े सध्या पक्षाकडे ङ्गारस ं आथिर्क पखठबळ जरी नसले, तरी हा पक्ष व पक्षातील कार्यकर्ते गोरगरीबांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आहेत. तेव्हा जनतेने कोणाच्या अमिषाला व भुलथापांना बळी न पडता, अशा उमेदवाराला मतदान केल्यास या तालुक्यात नक्कीच क्रांती घडेल, असा अशावाद व्यक्त करण्यात आला.